"तू आमचा राजा नाहीस"; घोषणा देत ब्रिटनच्या राजाला फेकून मारली अंडी

ब्रिटन: ब्रिटनचे नवे राजा म्हणजे किंग चार्ल्स तृतीय आणि त्यांची पत्नी कॅमिला यांना काल नामुष्कीचा सामना करावा लागला. ब्रिटनचे राजा आणि राणी यॉर्क शहराच्या दौऱ्यावर होते. तेव्हा तिथे काही लोक निदर्शनं करू लागले आणि अचानक त्यांनी या दोघांवर अंडी फेकायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.



ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूनंतर ७३ वर्षीय किंग चार्ल्स तृतीय हे राजा बनले. ते त्यांची ७५ वर्षीय पत्नी राणी कॅमिला यांच्यासोबर यॉर्क शहराच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी किंग चार्ल्स तृतीयच्या समोर हा देश सेवकांच्या रक्ताने बनला आहे आणि तू आमचा राजा नाहीस, अशा घोषणा देण्यात आल्या. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की बॅरिकेड्सच्या दुसऱ्या बाजूला थांबलेल्या व्यक्ती घोषणाबाजी करत आहेत.ही घोषणाबाजी सुरू असतानाच काही लोकांनी अंडी फेकायला सुरुवात केली. यापैकी दोन तीन अंडी किंग चार्ल्स तृतीयच्या आसपासही पडली. पण त्यांच्या अंगावर कोणतंही अंडं पडलं नाही. यासोबत लोकांनी देवा, राजाला वाचव, लाज वाटू द्या, अशा घोषणाही दिल्या.

ब्रिटनचा राजा आणि त्यांची पत्नी दोघेही यॉर्क शहरातल्या एका पारंपरिक कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे राजा चार्ल्सची आई एलिझाबेथ द्वितीयच्या मूर्तीच्या अनावरणाचा सोहळा होता. याच वर्षी ८ सप्टेंबर रोजी राणी इलिझाबेथ यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या मूर्तीचं अनावरण काल झालं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने