ट्रॅफीक नियम तोडल्याने ४ तासात दीडशे जणांना फाइन, चक्क निम्मे निघाले पोलिसवाले

दिल्ली: दिल्लीलगत असणाऱ्या गुरूग्रामध्ये काल अचानक वाहतुक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई मोहिम चालवण्यात आली. यात साधारण १५५ लोकांना फाइन करण्यात आला. यात धक्कादायक बाब म्हणजे ७० लोकं पोलीसवाले निघाले.अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हरियाणातल्या गुरूग्राम हद्दीत साधारण ४ तास पोलिस आयुक्त कार्यालय, पोलिस लाइन, स्थानिक कोर्टाच्या भागात हे अभियान अचानक राबवण्यात आलं होतं. फाइन केलेल्यांमध्ये एक सहाय्यक पोलिस आयुक्तांचा कार चालकाचा पण समावेश होता.एसीपींचा हा कार चालक सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडला गेला. त्याचं चालान कापलं गेलं आणि सीट बेल्ट लावण्याचा सल्ला दिला. अशा इतरही पोलिस चालकांना दंड करण्यात आला.

आता चप्पल घालून गाडी चालवल्यावर बसणार दंड

वाहतुक नियमांविषयी सगळ्यांमध्येच जागरुकता असावी. त्याचाच एक भाग म्हणजे चप्पल घालून कार चालवल्यावर १००० रुपये दंड बसणार आहे. अपघात कमी होण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने