'आईच्या गावात'..."उद्धव साहेब या भाषणांकडे लक्ष द्या"

मुंबई :  शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. सध्या त्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या सभेवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी राजकीय वादात उडी घेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना अंधारे यांच्या भाषणांकडे लक्ष द्या अशी मागणी केली आहे.शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत सुषमा अंधारे यांनी पक्षाशी संबंधित अनेक प्रकरणांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. किंबहुना पक्षाची बाजू स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अल्पकाळातच माध्यमांचं लक्ष वेधून घेतल्याचं दिसतं. अनेकदा त्यांनी त्यांच्या भाषणात वादग्रस्त शब्ददेखील उच्चारले आहेत.दरम्यान, अंधारे यांच्या भाषणावर तृप्ती देसाई यांनी आक्षेप नोंदवला आहे. महाप्रबोधन यात्रेवरून तृप्ती देसाई यांनी सुषमा अंधारे यांना लक्ष केलं आहे. भाषणात आयला आणि आईच्या गावात हे शब्द वापरून महाप्रबोधन करणाऱ्याचे प्रबोधन करण्यासाठी मला जावे लागेल असं म्हणत तृप्ती देसाई यांनी खोचक टोला लगावला आहे.तसेच, "उद्धव साहेब या भाषणांकडे लक्ष द्या" अशी थेट मागणीदेखील तृप्ती देसाई यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
सुषमा अंधारे यांच्या भाषणावर बंदी

गुलाबराव पाटलांच्या विरोधात धरणगावातील सभेतील वक्तव्य सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांना महागात पडल्याचं दिसून आलं .जळगावात महाप्रबोधन यात्रे दरम्यान सुषमा अंधारे आणि शरद कोळीचे झालेले भाषण फारच आक्रमक असल्याची टीका गुलाबराव पाटील समर्थकांनी केली आहे. म्हणूनच पोलिसांत तक्रार दिल्यानं सुषमा अंधारे आणि शरद कोळींच्या भाषणाव थेट बंदी घालण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने