संजय राऊत पुन्हा टीव्हीवर दिसायला लागले अन्....; शंभूराज देसाईंनी व्यक्त केली चिंता

 मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत जामिनावर तुरुंगातून बाहेर येताच पुन्हा सक्रीय झाले आहेत. दिवसभरातून अनेकदा ते वृत्तवाहिन्यांवर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.पण आता यामुळं राज्य सरकारला वेगळीच काळजी वाटू लागली आहे. याबाबत मंत्री शंभूराज देसाईंनी चिंता व्यक्त केली आहे.देसाई म्हणाले, "महाराष्ट्रातील वातावरण कोण बिघडवत असेल तर ते संजय राऊत आहेत. आम्ही आमचे काम करत आहोत. जेव्हापासून ते टीव्हीवर दिसू लागले तेव्हापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडायला लागलं आहे"महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जो कोणी सीमेजवळ राहतो त्याला पूर्ण अधिकार मिळतील. यासाठी चंद्रकांत पाटील आणि माझी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सीमाभागातील 85 गावांना जे हवं ते आम्ही देऊ, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रस्तावही दिला आहे. कर्नाटक सरकारनं वाद निर्माण केल्याचं पाहून आम्ही या विषयावर वेगानं काम करत आहोत, असंही देसाई यांनी सांगितलं आहे.आमचं शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे. कर्नाटक आपली कायदेशीर लढाई लढेल, आम्ही आमची लढू. महाराष्ट्राला न्याय मिळावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करू, असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने