भारतात फुटबॉल विश्वचषक विनामूल्य कसा पाहाल; जाणून घ्या एका क्लिकवर

कतार: रविवारी (20 नोव्हेंबर) कतारमध्ये सुरुवात होणार आहे. बहुतांश संघांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारखे खेळाडू आपला शेवटचा विश्वचषक खेळणार आहेत. कतारमध्ये 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता कतार आणि इक्वाडोर यांच्यातील सामन्याने या फुटबॉल विश्वचषकाची सुरुवात होईल.फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत 32 संघ सहभागी होत आहेत. या सर्व संघांमध्ये १८ डिसेंबरपर्यंत सामने खेळळे जातील. FIFA विश्वचषक 2022 चे सर्व 64 सामने कतारमधील 8 स्टेडियममध्ये खेळळे जाणार आहेत.कतारमध्ये FIFA विश्वचषक 2022 कधी सुरू होईल आणि संपेल?

FIFA विश्वचषक 2022 कतारमध्ये रविवारी (20 नोव्हेंबर) सुरू होईल आणि अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

कतारमध्ये FIFA विश्वचषक 2022 चे सामने कोणत्या स्टेडियममध्ये खेळवले जातील?

कतारमधील FIFA विश्वचषक 2022 चे सर्व सामने जवळपास 8 स्टेडियममध्ये खेळवले जातील. यामध्ये अल बायत स्टेडियम, लुसाइल स्टेडियम, अहमद बिन अली स्टेडियम, अल जनुब स्टेडियम, अल थुमामा स्टेडियम, एज्युकेशन सिटी स्टेडियम, खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम आणि स्टेडियम 974 यांचा समावेश आहे.

FIFA विश्वचषक 2022 मध्ये किती संघ खेळत आहेत?

कतार येथे होणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 मध्ये 32 संघ खेळत आहेत. विश्वचषक स्पर्धेत आठ गट असून प्रत्येक गटात चार संघ आहेत.

ग्रुप A - कतार, इक्वाडोर, सेनेगल, नेरदलँड

ग्रुप B - इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स

ग्रुप C - अर्जेंटीना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड

ग्रुप D - फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, ट्युनिशिया

ग्रुप E - स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान

ग्रुप F - बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया

ग्रुप G - ब्राझिल, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून

ग्रुप H - पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक

FIFA विश्वचषक 2022 चे भारतात थेट प्रक्षेपण कोठे केले जाईल?

FIFA विश्वचषक 2022 भारतात स्पोर्ट्स18 आणि स्पोर्ट्स18 एचडी चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाईल.

भारतात FIFA विश्वचषक 2022 चे लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?

FIFA विश्वचषक 2022 चे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे तुम्ही फुटबॉल विश्वचषक विनामूल्य पाहू शकता. अॅपवर हिंदी, इंग्रजी, तमिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग होईल.

FIFA विश्वचषक 2022 भारतात किती वाजता प्रसारित होईल?

भारतात फुटबॉल विश्वचषक सामन्यांसाठी चार टाइम स्लॉट असतील. दुपारी 3:30, संध्याकाळी 6:30, रात्री 9:30 आणि दुपारी 12:30 वाजता पाहता येतील तसेच रात्री 8:30 वाजता बाद फेरीचे सामने सुरू होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने