आता Elon Musk स्वत: ट्विटरचे CEO बनणार; सर्व संचालक मंडळ बरखास्त!

 सॅन फ्रान्सिस्को : ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क  यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर, आता ट्विटरचं संचालक मंडळ (Twitter Directors Board) बरखास्त केलंय. ट्विटरच्या सर्व संचालकांना हटवून त्यांनी कंपनीची कमान हाती घेतलीय.यासह मस्क यांनी जाहीर केलंय की, ते लवकरच ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी स्वीकारतील. यामुळं इलॉन मस्क आगामी काळात अनेक मोठे निर्णय घेऊ शकतात. ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर, इलॉन मस्क ट्विटरचे नवे बॉस बनलेत. त्यांनी सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. आता मस्क यांनी ट्विटरचं संचालक मंडळही बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय. संचालक मंडळातून ब्रेट टेलर, ओमिड कोर्डेस्तानी, डेव्हिड रोसेनब्लाट, मार्था लेन फॉक्स, पॅट्रिक पिशेट, एगॉन डर्बन, फी-फेई ली आणि मिमी अलेमायेहौ यांची हकालपट्टी करण्यात आलीय.

'ब्ल्यू टिक'साठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार!

'या जगात काहीही मोफत मिळत नाही.' ही म्हण सर्वांनी ऐकली असेलच, पण ट्विटरचे नवे सीईओ इलॉन मस्क यांनी ती फारच गांभीर्यानं घेतल्याचं दिसतं. द व्हर्जमधील वृत्तानुसार, मस्क लवकरच ट्विटरवरील पडताळणी प्रक्रियेत बदल करणार आहे. या अंतर्गत मस्क नवीन ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन प्लान आणू शकतात. वापरकर्त्यांकडून 1600 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळं ट्विटर वापरकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने