अनुपम खेर यांनी KBCच्या सेटवर बिग बींना केला मसाज, नीना गुप्ता म्हणाल्या…

मुंबई :‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन लाखो रुपये जिंकतात. एक कोटी रुपयांची रक्कमही काही स्पर्धक मिळवतात. हा शो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. या कार्यक्रमात जसे स्पर्धक येत असतात तसेच कलाकारदेखील येत असतात. या कार्यक्रमात नुकतीच अनुपम खेर आणि बोमन इराणी, नीना गुप्ता या कलाकारांनी हजेरी लावली होती.या दोन कलाकारांच्या येण्यामागचं प्रयोजन म्हणजे राजश्री प्रॉडक्शनची निर्मिती असलेला मल्टीस्टारकास्ट चित्रपट ‘उंचा’ई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हे दोन कलाकार कार्यक्रमात आले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चनदेखील आहेत. सोनी वाहिनीने त्याचा प्रोमो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन आपल्या मित्रांचे कसे स्वागत करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

इतकंच नाही तर अनुपम खेर यांनी शोमध्ये अमिताभ यांच्या खांद्यावर मालिश केलं. याच बरोबरीने डान्स मस्ती सुरू असताना या कार्यक्रमात भावनिक बोलणेही पाहायला मिळणार आहे, जे पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. या चित्रपटात हे कलाकार मित्रांच्या भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटाची कथा ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. या ४ पैकी एका मित्राचं निधन होतं, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचं ठरवतात.११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या या चित्रपटाच्या निमित्ताने ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. चित्रपटात या दिग्गज अभिनेत्यांच्या बरोबरीने सारिका परिणीती चोप्रा यांचादेखील मुख्य भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने