“तुम्ही बोलण्याआधी…” वीणा जगतापची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबईः  छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून बिग बॉसकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगतापकडे पाहिले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच वीणा जगतापने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.बिग बॉस या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगतापकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठी २ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलेच गाजले. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले होते. विशेष म्हणजे वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही हातावर गोंदवून घेतला होता. तसेच शिव बिग बॉसचा विजेता ठरल्यानंतर तिने जंगी सेलिब्रेशनही केले होते. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर अनेकदा तिला ट्रोल केले गेले.दरम्यान वीणा जगताप हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. वीणा ही बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धी झोतात आली होती. त्यानंतर ती राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत झळकली होती. त्याबरोबर तिने आई माझी काळुबाई या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने