File No 323: अनुराग कश्यप होणार 'विजय मल्ल्या'!

मुंबई -  बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अनुराग हा नेहमीच त्याच्या वेगळया दिग्दर्शनाच्या कौशल्यासाठी ओळखला गेला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा दोबारा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कायम वेगवेगळ्या प्रकारच्या वादात अडकलेल्या अनुरागच्या नव्या प्रोजेक्टविषयीची माहिती आता समोर आली आहे.मद्यसम्राट, किंग फिशरचा सर्वेसर्वा विजय मल्ल्याला कोण ओळखत नाही. भारताला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात जावून बसलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी यापूर्वी अनेकदा मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मोदींनी देखील त्यांच्या भाषणांमध्ये त्याविषयी खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी भारताला आतापर्यत ज्या उद्योगपतींनी गंडवून परदेशात मुक्काम ठोकला आहे, अशा व्यक्तिंवर माहितीपटाची निर्मिती केली होती.

अनुराग हा विजय मल्ल्याला भूमिका साकारणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. एक दिग्दर्शक म्हणून त्याची क्षमता चाहत्यांना माहिती आहे. मात्र अभिनेता म्हणूनही त्यानं अनेक कलाकृतींमधून स्वताचे वेगळेपण सिद्ध केले आहे. दिग्दर्शक कार्तिक के यांच्या फाईल नं ३२३ मध्ये अनुराग दिसणार आहे. त्याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.विजय मल्ल्याला वेगवेगळ्या घडामोडींवर आधारित या चित्रपटामध्ये माल्याची व्यक्तिरेखा अनुराग कश्यप करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे, पुढील वर्षी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने