‘बिग बॉस मराठी’मध्ये मोठा ट्विस्ट, पहिल्यादांच होणार चार वाइल्ड कार्ड एन्ट्री, ‘ते’ स्पर्धक कोण असणार?

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व रंजक दिवसेंदिवस होत चाललं आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसने सदस्यांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट येणार आहे. नवीन चार सदस्यांची ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये घरात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची घोषणा बिग बॉस करताना दिसत आहेत. घरातील सदस्यांचे खरे चेहरे आता कुठे स्पर्धकांना दिसत आहेत. त्यातच आता चार नवीन सदस्यांची घरात एन्ट्री होत असल्याने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील रंग उडताना दिसणार आहेत.‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या येणाऱ्या भागात शनिवार व रविवारी चार सदस्य वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच चार सदस्य वाइल्ड कार्डमधून घरात प्रवेश करणार आहेत. घरातील सदस्यांसह बिग बॉसने प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणारे सदस्य कोण असतील याबाबत सदस्यांसह प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.बिग बॉस’च्या घरात याआधी स्नेहलता वसईकरने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केला होता. आता चार सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर घरातील समीकरणं किती बदलणार हे पाहणं रोमांचक ठरणार आहे. ५० दिवस उलटल्यानंतर आता बिग बॉस मराठीचं पर्व आणखीनच रंजक होत चाललं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने