एकेकाळी रस्त्यावर गाणे गात पैसे कमावले अन् आता चाहत्यांच्या मनावर करतोय राज्य...

मुंबई :  बिग बॉस 16 आता रंगात आला आहे. यास्पर्धेतील स्पर्धकांचे खरे चेहरे आता समोर येत आहेत. काही स्पर्धक त्यांच्या वादामुळे चर्चेतच आले तर काही जोरदार भांडणामुळे ओळखले गेले. मात्र अब्दू रोजिक हा एकमेव असा स्पर्धक आहे जो केवळ त्याच्या निरागसतेमुळे सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचे केवळ भारतातच नव्हे तर पुर्ण देशभरात चाहते आहे.अब्दूबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते फार उत्सुक आहेत. तो मुळचा ताजिकिस्तानचा राहणारा असून तो बिग बॉसच्या घरात येण्याअगोदरच त्याच्या फनी व्हिडिओमुळे चर्चेत होता. तो जगभरात प्रसिद्ध होता. अब्दू आज त्याच्या लक्झरी लाइफसाठी ओळखला जातो पण एकेकाळी त्याने त्याच्या आयुष्यात खूप कठीण प्रसंगही पाहिले आहेत.अब्दूच्या जुणा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांचा आहे. अब्दू रोजिकचे बालपण खूप कठीण होते. घरातील परिस्थीती हालाकीची असल्यामुळे आर्थिक विवंचना कमी करण्यासाठी अब्दू रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमवायचा.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अब्दू एका फळांच्या दुकानासमोर उभे राहून गाणे म्हणत आहे आणि लोक त्याला पैसे देत आहेत. भलेही लहान असेल पण आज त्याच्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर त्यांने जगभरात ओळखला जातो. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला बिग बॉस स्पर्धत सहभागी होण्याचे निमंत्रणही मिळाले.

अब्दू आता जरी लक्झरी लाइफ जगत असला तरी तो त्याचे बालपणीचे दिवस विसरलेला नाही. 'बिग बॉस'च्या घरात साजिद खानसोबत बोलताना अब्दूने त्याच्या वाईट दिवसांचा उल्लेख केला होता. आमच्याकडे राहण्यासाठी घरही नाही, पावसाळ्याच्या दिवसात परिस्थिती बिकट होते,  छतावरून पाणी टपकत असायचे असे अब्दूने सांगितले होते. हळूहळू जेव्हा माझी ओळख निर्माण झाली आणि मला काम मिळू लागलं, तेव्हा माझं उत्पन्नही चांगलं झालं. मी माझ्या परिवारासाठी एक छान घर विकत घेतलं आहे. आता मी आणखी एक मोठे घर घेण्याचा तो विचार करत आहे’. वडिलांना मोठे घर विकत घेऊन ते देण्याची त्याची इच्छा त्याने स्वबळावर पुर्ण केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने