भारतात महिलांना आजही असुरक्षितता का जाणवते? सुरक्षिततेसाठी ही काळजी नक्की घ्यावी..

मुंबई : भारतात तंत्रज्ञान सुधारलं, स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने नोकरी आणि व्यवसाय करायला लागल्यात तरी मात्र स्त्रीयांवर होत असलेले अत्याचार थांबलेले नाहीत. काही स्त्रीयांवर होत असलेले विविध अत्याचार बघून अन्य स्त्रीयांच्या मनात धास्ती निर्माण होणे साहाजिक आहे. भारतातील स्त्रीयांना असुरक्षितता जाणवण्यामागे प्रमुख कारणातील हे एक महत्वाचे कारण आहे.

महिलांसाठी रात्रीचे एकांत रस्ते म्हणजे भीती बाळगण्याचं एकमेव कारण आता राहिलेलं नाहीये. सोशल मीडियाच्या जगात सेक्स्टॉर्शन, मुलींचे सोशल अकाऊंटवरील फोटोज अश्लील स्वरूपात बदलत व्हायरल करणे व नंतर धमकी देणे, ब्लॅकमेलींग करणे असे कितीतरी प्रकार रोज देशभऱ्यात घडत असतात.अनेक कुटुंब प्रतिष्ठेच्या नावावर त्यांच्या मुलींवर झालेला अत्याचार निमुटपणे सहन करत गप्प बसतात. मग अशा वेळी एका महिलेवर झालेल्या अत्याचारानंतर दुसऱ्या महिलेस असुरक्षित वाटणं सहाजिक आहे.महिलांना असुरक्षितता जाणवण्याची आणखी काही कारणे

भारतातील पितृसत्ताक मनोवृत्ती आणि परंपरेने आजही समाजातील अनेक भागांत महिलांना हवे ते स्वातंत्र्या दिले गेलेले नाही. अशा वेळी त्यांना असुरक्षित वाटूच शकतं.देशभऱ्यात रोज घडणाऱ्या घटनांमुळे महिलांना सोशल मीडिया आणि खऱ्या आयुष्यातही भीतिदायक वाटू लागलंय.

हिलांची असुरक्षिततेची भिती दूर होण्यास या काही गोष्टी तुम्हाला मदत करतील.

  • महिलांसाठी आवश्यक असणारे सगळे हेल्पलाईन नंबर्स तुमच्याजवळ सेव्ह असावे.

  • याशिवाय उशिरा काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने त्यांच्या कार्यालयातील किमान काही विश्वासपात्र सहकाऱ्यांचा नंबर त्यांच्या स्पीड डायलवर ठेवावा. हे तुम्हाला संकट काळात तुरंत संपर्क करण्यासाठी महत्वाचे ठरेल.

  • कायम अलर्ट झोनमध्ये राहा. कितीही थकवा आला असला तरी तुमच्या सुरक्षिततेसाठी कृपया उशीरा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांनी कॅबमध्ये झोपणे टाळावे. तसेच या दरम्यान फोनद्वारे तुमच्या आप्तस्वकियांच्या संपर्कात राहावे. तुमच्याजवळ कृपया पेपर स्प्रे जवळ ठेवा.

  • ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या पुरुषाला घेऊन असुरक्षित वाटत असेल तर गप्प बसू नका. लगेच तुमच्या वरिष्ठांना याबाबत कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने