खर्च जपून करा! जगावर आर्थिक मंदीचे सावट- जेफ बेझोस

अमेरिका:  सध्या जगभऱ्यात चाललेल्या आर्थिक मंदीचा परिणाम थेट सर्वासामान्यांच्या आर्थिक जीवनावर होणार आहे. कोरोना महामारीनंतरचं वर्ष २०२२ असून या वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात सगळ्यांना जपून खर्च करावा लागणार आहे. जगातल्या चौथ्या क्रमांकाच्या जेफ बेझोस या श्रीमंत व्यक्तीने सर्वसामान्य लोकांना हा सल्ला दिला आहे. जगावर ओढवणाऱ्या आर्थिक मंदीचं स्वरूप कसं असणार आहे ते जाणून घेऊया.जगातील टॉप पाच लोकांच्या यादीत असलेले जेफ बेझोस यांनी त्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा केलाय. बेझोस म्हणतात, पुढल्या वर्षी आर्थिक मंदीचे सावट असणार आहे. तेव्हा प्रत्येकाने खर्च जपून करावा. तेव्हा लोकांना पैशांची आणि इंधनाची बचत करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.
जगाला सल्ला देणाऱ्या बेझोस यांचा व्यवसाय नक्की काय आहे?

जेफ बेझोस हे अमेझॉनचे संस्थापक आहेत. बेझोस यांनी त्यांच्या संपत्तीचा बराच हिस्सा कल्याणकारी योजनांमध्ये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलंय की, मी माझ्या संपत्तीचा मोठा हिस्सा लोकहितार्थ योजनांमध्ये दान करणार आहे. तसेच हवामान बदलांसंबंधी समस्यांवर काम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहाणार आहे. जेफ यांची एकूण संपत्ती १२४ अब्ज डॉलर एवढी आहे.

आर्थिक मंदी कशा स्वरूपाची असणार आहे?

आर्थिक मंदीचा धोका अमेरिका या देशावर कायम असणार आहे. या देशातील लोकांना महागड्या वस्तूंची खरेदी टाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आर्थिक मंदीची तीन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे कोविड महामारी आणि दुसरं म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध तर तिसरं म्हणजे क्रुड तेलाचा बसलेला फटका.कोविड काळात शेअर मार्केट उंचावते होते मात्र मंदीच्या काळात शेअर मार्केटची स्थिती काय असणार आहे ते येणारा काळच ठरवू शकेल. येणाऱ्या काळात आपल्याला पुढच्या पिढीचा विचार करून पैशांबरोबरच संसाधनेही वाचवायची आहे, असेही जेफ म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने