‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल कॅबिनेट मंत्र्याचं सुबोध भावेला पत्र, म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका…”

 मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक पटांची लाटच आली आहे. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. इतर ऐतिहासिक चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे.अभिनेता सुबोध भावेने चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा अनुभवता आला. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाबद्दल सुबोध भावेला पत्र लिहीत त्याचं कौतुक केलं आहे. झी स्टुडिओ मराठीने त्यांच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे पत्र शेअर केलं आहे.हर हर महादेव’ चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्न्ड या भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने