यट्यूबपेक्षा जास्त...', आता ट्विटरचे युजर्सदेखील होणार मालमाल

अमेरिका :  यूट्यूब हा जागतिक स्तरावर वापरलेला जाणारा व्हिडीओ शेअरिंगचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. मात्र, आता याच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी ट्विटर पुढे सरसावले आहे. त्यासाठी एलन मस्क यांनी नवी योजना आखली आहे. अशी माहिती समोर आली आहे.ट्विटरवर ताबा घेताच एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. आता युजर्ससाठी त्यांनी आनंदाची बातमी समोर आणली आहे. ट्विटरचे युजर्सदेखील आता मालामाल होणार आहेत. मस्क ट्विटरबद्दल काही गोष्टी हळूहळू स्पष्ट करताना दिसत आहेत. कंपनी लवकरच कंटेंट क्रिएटर्सना यातून पैसे कमावण्याची संधी देणार आहे. इलॉन मस्क यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. आगामी काळात यूजर्स त्यावर मोठे व्हिडिओही पोस्ट करू शकणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी युजर्सना सर्व प्रकारच्या कंटेटमधून पैसे कमविण्याची संधी देणार आहे. म्हणजेच, व्हिडिओंव्यतिरिक्त इतर कंटेंटद्वारेदेखील पैसे कमावु शकणार आहेत. एका युजरने यूट्यूब जाहिरात कमाईच्या 55% निर्मात्यांना देते असे ट्विट केले होते. त्यावेळी याला उत्तर देताना एलन मस्क यांनी स्पष्ट केलं.'आम्ही यापेक्षा जास्त देऊ शकतो. असे उत्तर मस्क यांनी त्या युजर्सला दिले. दरम्यान, त्यापूर्वी एका कंटेट क्रिएटरने युजर्स तेव्हा मोठी व्हिडीओ शेअर करु शकतात जेव्हा त्यांना पैसे मिळतील. असे म्हटले. तर Erdayastronaut नावाच्या ट्विटर हँडलवर यूट्यूब सारखी मॉनिटाइजेशन सिस्टम मिळाली तर युजर्स संपूर्ण व्हिडीओ अपलोड करू शकतात.

यावर, 'यावर आम्ही सध्या ब्लू सबस्क्रिप्शनसाठी 1080 रिझोल्यूशनवर 42-मिनिटांचा भाग करत आहोत. यामुळे तुम्ही लॉंग व्हिडीओ शेअर करु शकता. पुढील महिन्यात ही मर्यादा निश्चित केली जाईल.' असे उत्तर मस्कने दिले. त्यामुळे, लवकरच मस्क आगामी काळात कमाईबद्दल अधिक माहिती देऊ शकतात. यासोबतच, ट्विटर लवकरच नोटपॅड स्क्रीनशॉटचा वापर काढून ट्विटमध्ये लांब मजकूर जोडण्यासाठी एक नवीन वैशिष्ट्य जोडेल, असे मस्क यांनी सांगितले आहे.ट्विटर सध्या 'ट्विटर आर्टिकल' फीचरवर काम करत आहे. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना लांब मजकुरासह ट्वीट पोस्ट करण्यास अनुमती देईल. सध्या ट्विटर वापरकर्त्यांना ट्विट करण्यासाठी 280 अक्षरांची मर्यादा देते. सद्या, युजर्स लांब पोस्ट शेअर करण्यासाठी थ्रेड्स वैशिष्ट्य वापरतात. ट्विटरने नोव्हेंबर 2021 मध्ये एक रीडर वैशिष्ट्य देखील जाहीर केले. ज्यामुळे लांब थ्रेड्स वाचणे सोपे होते. हे वैशिष्ट्य ब्लू टिक सदस्यांसाठी मर्यादित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने