“मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ” किरण मानेंची ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एन्ट्री, स्पर्धकांना त्यांची जागा दाखवणार

मुंबई: कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये एक ट्विस्ट आला. गेल्या आठवड्याअखेर झालेल्या एलिमिनेशनमध्ये यशश्री मसुरकर घराबाहेर पडली. तर किरण मानेही घराबाहेर जाणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं. पण किरण यांना ‘बिग बॉस’ने विशेष अधिकार देत सीक्रेट रूममध्ये ठेवलं होतं. आता किरण यांची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री होणार आहे.कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किरण माने घरात एन्ट्री करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी घरामध्येच प्रवेश करताच त्यांच्याच आवाजातील हिंदी संवाद ऐकायला मिळत आहे.“तुम मुझे वहाँ ढुंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ” असं म्हणत किरण घरामध्ये पुन्हा एंट्री करतात. किरण घरामध्ये येताच ‘बिग बॉस’ त्यांना एक टास्क देतात. घरातील प्रत्येक सदस्याला नंबरनुसार तो कितपत चांगला स्पर्धक आहे हे किरण यांना सांगायचं आहे.किरण यांनी घरात प्रवेश करताच अमृता धोंगडेने मात्र त्यांच्यावर राग व्यक्त केला असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. “जे बाकीचे करत आहेत तेच तुम्ही करत आहात.” असं किरण यांच्यावर ती आरोप करताना दिसत आहे. मात्र किरण घरात आल्यानंतर काही सदस्यांचे चेहरे पडले असल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने