आईचीच इच्छा नाही कार्तिकनं लग्न करावं! काय आहे कारण?

मुंबई: कार्तिक आर्यनचा 'भूलभूलैय्या 2' या वर्षातील सगळ्यात मोठ्या हिट सिनेमांपैकी एक.. या सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील यशानं कार्तिकला बड्या स्टार्सच्या पंक्तीत थेट बसवलंय असं म्हणायला हरकत नाही. आता तर कार्तिकचा बॉलीवूडमधील प्रवासाचा रस्ता आणखी सुखकर झाला आहे. कार्तिकचा लेटेस्ट सिनेमा 'फ्रेडी' नुकताच ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे आणि या सिनेमातील त्याच्या भूमिकेची प्रशंसा सर्वदूर होत आहे. या सिनेमात कार्तिकनं आपल्या भूमिकेच्या ग्रे शेडला अगदी उत्तम रंगवल्याची दाद त्याला मिळताना दिसत आहे.

 


2022 मध्ये एक धमाकेदार सिनेमा आणि समिक्षकांचे त्या माध्यमातून मन जिंकणाऱ्या कार्तिकनं आता एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे की, या सिनेमाच्या यशानंतर अनेक निर्मात्यांची तो पहिली पसंत बनला आहे,आणि त्याला वाटतंय की हे असं त्याच्यासोबत कायम होत राहो. कार्तिकनं त्या मुलाखतीत असं देखील म्हटलं आहे की,''हे असं काही बोलल्यावर लोकांना वाटेल की मी अतिआत्मविश्वासू झालो आहे,माझ्या डोक्यात हवा गेली आहे...पण असं बोलल्यानं मला स्वतःला खूप सकारात्मक वाटतं म्हणून मी हे बोलतो''. कार्तिकनं आपल्या लग्नाविषयीच्या प्लॅन्सवर आणि साऊथचे सिनेमे करण्याविषयी देखील काही खुलासे केले आहेत.कार्तिक सध्या बॉलीवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. त्याचे चाहते नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायला त्यामुळे उत्सुक दिसतात. त्यात सर्वात अधिक चाहत्यांना रस असतो ते कार्तिकच्या लग्नाविषयी जाणून घेण्यात. कार्तिकनं मुलाखतीत सांगितलं की सध्या त्याने त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या करिअरवर केंद्रित केलं आहे आणि त्याच्यावर त्याच्या कुटुंबियांकडून देखील लग्नासाठी कोणताच दबाव नाही. उलट, आपल्या आईनं लग्नाविषयी खास सल्ला देखील आपल्याला दिल्याचं तो म्हणाला.

कार्तिक म्हणाला,''माझ्या आईला वाटतं की मी आधी माझ्या आयुष्यात सेटल व्हायला हवं,त्यासाठी आणखी 3 ते 4 वर्ष मी खूप काम करायला हवं. तिला वाटतं मी माझं पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करावं. मी देखील माझ्या कामावर त्यामुळे फोकस आहे. आणि आई कडून लग्नासाठी कोणताच दबाव नाही यासाठी मी देवाचे आभार मानतो. पण हे सगळं असलं तरी माझ्या आयुष्यात प्रेमासाठी मात्र नक्कीच एक विशेष स्थान आहे''.कार्तिक यावेळी बॉलीवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. पण त्याला स्वतःला केवळ हिंदी सिनेमांपुरतं स्तिमित ठेवायचं नाही. कार्तिक म्हणाला की, ''मला कोणत्याही भाषेतील सिनेमा करायला आवडेल,पण हे सर्व त्या सिनेमाची कथा कशी आहे यावर अवलंबून असेल. मला तामिळ सिनेमे करायला अधिक आवडतील''.मला निर्माते-दिग्दर्शकांना हा आत्मविश्वास निर्माण करुन द्यायचा आहे की मी कोणत्याही प्रकारची भूमिका करू शकतो. मला वाटतं माझ्याशिवाय कोणता दुसरा अभिनेता निर्माते-दिग्दर्शकांना दिसलाच नाही पाहिजे. मी मेहनत करून तिथपर्यंत पोहोचत आहे. आणि पुढील वर्षापर्यंत माझ्याऐवजी त्यांच्याकडे कोणता दुसरा ऑप्शन उरणार नाही''.कार्तिक आता आपल्याला 'शहजादा' मध्ये देखील दिसणार आहे. तर कियारा अडवाणी सोबत 'सत्य प्रेम की कथा' सिनेमातही तो आहे. या दोन सिनेमां व्यतिरिक्त कार्तिक हंसल मेहतांच्या 'कॅप्टन इंडिया' सिनेमात देखील आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने