राजभवनाबाहेर एकवटले माजी महापौर; हातात झळकले पोस्टर्स

पुणेः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात आंदोलनं होत आहेत. त्यातच आता पुण्यातील माजी महापौरांनी एकत्र येत एक अनोखं आंदोलन केलं आहे.पुण्यातील राजभवनाबाहेर महापौरांनी हातामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाचे पोस्टर्स घेऊन धरणे आंदोलन केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १५ माजी महापौर आंदोलनामध्ये सहभागी झाले. भाजपचे केवळ एक महापौर दत्ता गायकवाड आंदोलनस्थळी दिसून आले.या आंदोलनामध्ये मुरलीधर मोहोळ आणि मुक्ता टिळक यांचा सहभाग नव्हता. यावेळी आदोलकांनी राज्यपालांना जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे. माजी महापौरांच्या या धरणे आंदोलनाने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनीदेखील शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं लाड म्हणाले. त्यानंतरही पुन्हा सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. लाड यांनी त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने