बिगबॉसच्या घरातील वाद नडणार...विकासला घरातून हाकललं?

मुंबई:  बिग बॉस सीझन 16 मध्ये आतापर्यंत अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकवेळा हाय व्होल्टेज ड्रामा झाला तर कधी प्रकरण हाणामारी पर्यंत पोहचलं. मात्र आता तर कहरचं झाला.आता प्रकरण इतक वाढलं की त्यात बिग बॉसला नव्हे तर थेट घटनात्मक संस्थेला हस्तक्षेप करावा लागला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) बिग बॉसच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. या शोमध्ये स्पर्धकांनी केलेल्या वादग्रस्त जातीच्या वक्तव्यावर उत्तर मागवण्यात आले आहे.त्याच झालं असं की, अर्चना गौतम आणि वाइल्ड कार्ड स्पर्धक विकास मनकतला यांच्यात चांगलचं बिनसलं होतं पण त्यात विकासने आपली पातळी सोडून अर्चनावर अशा कमेंट केल्या की त्याचा फटका आता संपूर्ण शोला सहन करावा लागू शकतो.आता अशीही बातमी येत आहे की या गंभीर प्रकरणात निर्माते विकास मनकतला शोमधून बाहेर काढू शकतात. बिग बॉस शोशी संबंधित बातम्या देणाऱ्या एका ट्विटर हँडलवर विकास मनकतलाबद्दल दावा करण्यात आला आहे की निर्माते त्याला या प्रकरणामूळे शोबाहेर काढून टाकतील. विषेश म्हणजे या आठवड्यात विकासही नॉमिनेट झाला आहे.

कोण आहे अर्चना गौतम

अर्चना गौतमही काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. तिने हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे मात्र तिथं तिला पराभवाचा सामना करावा लागला .अर्चना गौतम आणि विकास मनकतला यांच्यातील भांडणामुळं बाहेर झालेल्या राड्यावरुन आता मेकर्सचा राग अर्चनावरही फुटणार आहे. विकासावरही बिगबॉस चांगलाचं संतापणार आहे. पण हे पहिल्यांदाच झालेलं नाही तर याआधीही एमसी स्टॅन वरुन बराच गोंधळ झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने