आमिर खान 'टॉलीवूड' च्या वाटेवर, KGF दिग्दर्शकासोबत झळकणार!

मुंबई: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा आता बॉलीवूड सोडून टॉलीवूडमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत निल यांच्या एका चित्रपटामध्ये तो दिसणार असल्याची चर्चा आहे. निल यांनी यशला घेऊन केजीएफच्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.ग्रेट आंध्रनं दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत निल यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलं की, आता प्रशांत निल हे आमिर खानला घेऊन एक चित्रपट करणार आहे. त्यामध्ये ज्युनिअर एनटीआर देखील दिसणार आहे. सध्या प्रशांत निल हे त्यांच्या सालार नावाच्या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. मात्र त्यांच्या या चित्रपटाचे चाहत्यांना वेध लागले आहेत. सालारमध्ये प्रभास मुख्य भूमिकेत आहे.
वीस वर्षांपूर्वी सुचली होती आयडिया...

नव्या वर्षात या चित्रपटाची शुटींग सुरु होणार असून त्यामध्ये ज्युनिअर एनटीआऱ असणार आहे. प्रशांत नीलनं त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, साधारण वीस वर्षांपूर्वी चित्रपटाची कल्पना सुचली होती. त्यावर कामही केले होते. मात्र त्याची सुरुवात होत नव्हती. प्रशांत यांनी ही गोष्ट ज्युनिअर एनटीआरच्या बर्थ डेच्या निमित्तानं शेयर केली होती.

पॅन इंडियामध्ये होणार प्रदर्शित...

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट पॅन इंडियाचा प्रोजेक्ट असणार आहे. तो पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये प्रशांत नील हे व्हिलनचा रोल करणार आहे. मात्र त्यावर अजुन अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आमिरनं यावर्षी नोव्हेंबरमध्ये आपण काही काळ ब्रेक घेणार असल्याचे सांगितले होते.आमिरला त्याच्या लाल सिंग चढ्ढाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाचा झालेला नकारात्मक प्रतिसाद हा त्याला महागात पडला.आमिर सारख्या कलाकाराच्याबाबत झालेल्या या प्रकारानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. आता तर शाहरुखचा पठाण आणि सलमान खानचा टायगर ३ हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने