घाबरलं बेनं! राखीने मस्करी मस्करीत विकासची ठासली..

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहे. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती... काय करेल याचा नेम नाही. तिच्या वागण्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. काल तर रायखीने विकासची भलतीच मस्करी केली. यावेळी विकासची चांगलीच घाबरगुंडी उडलेली दिसली. राखीने अंगात भूत संचारल्या सारखीच घरात फिरत होती.बिग बॉस मराठीच्या घरात सध्या रोज नवीन राडा सुरू आहे. अक्षय - प्रसाद मध्ये झाला जोरदार राडा असो किंवा अपूर्वा आणि विकासचं कडक्याचं भांडण.. ही सगळे सदस्य एकमेकांशी भांडत असले तरी राखी मात्र रासिकांचं फुल्ल टू मनोरंजन करत आहे. राखीने आपल्या मिश्किल स्वभावाने राखी मनोरंजनाचा बार उडवत आहे. असाच एक बार तिने काल विकासवर सोडला..कालपासून राखीने घरात धुडगूस घातला आहे. राखीच्या वागण्यामुळे विकासची घाबरगुंडी उडाली आहे... तिने सध्या अंगात भूत संचारल्यासारखे वागायचे ठरवले आहे, त्यामुळे ती कुणाला काहीही बोलत आहे. त्यामुळे सदस्यांचे कालपासून जगणे मुश्किल केले आहे.. विकासला तर तिने वेड लावलं आहे. तू माझा नवरा आहे.. असं ती विकासला म्हणाली..राखी विकासला म्हणाली, याचं नावं राजू आहे, हा माझा नवरा आहे... राखीच्या वागणुकीला बघून किरण माने विकासला म्हणाले, तिच्या अंगात काहीतरी आलंय... राखीने विकासला विचारले, तुला माझं भयानक रूप बघायचे आहे का ? मी तुला सोडणार नाही... राखीच्या या अवताराने प्रेक्षक आणि घरातले सदस्य वेडे झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने