अंकित गुप्ता जाताच ‘बिग बॉस’च्या घरात नवीन सदस्याची एंट्री, पाहा नेमकं कोण आलंय?

मुंबई: ‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व सुरू आहे. शो सुरू होऊन तब्बल १२ आठवडे झाले आहेत. रविवारच्या एपिसोडमध्ये अंकित गुप्ता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडला. घरातील सदस्यांनी त्याच्याविरोधात मतदान करून घराबाहेर पाठवलं. अंकित घराबाहेर पडताच आणखी एका सदस्याची घरात एंट्री झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काही आठवड्यांपूर्वीच श्रीजिता डे आणि विकास मानकतला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आले होते. त्यातच आता घरात नव्या सदस्याचं आगमन झालंय.‘बिग बॉस’ने घरात आणखी एका सदस्याचे स्वागत केलं आहे. बिग बॉस १६ च्या नवीन प्रोमोमध्ये माहिम नावाचा कुत्रा घराचा नवीन सदस्य म्हणून दाखवण्यात आला आहे. 
‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी ट्विटरवर माहिमच्या घरातील एंट्रीची एक क्लिप शेअर केली आहे. “घरातील सर्वात नवीन सदस्य माहीमचं स्वागत करा,” अशा कॅप्शनने निर्मात्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.दरम्यान, या आठवड्यात अंकित गुप्ता हा ‘बिग बॉस १६’ मधून बाहेर पडला. तो बाहेर पडल्यानंतर अब्दू रोजिक घरात परतला. अब्दू त्याच्या काही वैयक्तिक व्यावसायिक प्रोजेक्ट्सची शूटिंग करण्यासाठी काही दिवस घराबाहेर होता. सध्या बिग बॉसच्या घरात साजिद खान, अब्दू, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निमृत कौर अहलुवालिया, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम, श्रीजिता डे, सौंदर्या शर्मा, शालिन भानोत, टीना दत्ता आणि विकास हे सदस्य आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने