“…म्हणून तिची बाजू घेतलीच नाही” रोहित शिंदेने सांगितले रुचिराला बिग बॉसमध्ये पाठिंबा न देण्याबद्दलचे कारण

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरात वाद, रुसवे-फुगवे, प्रेमप्रकरण या गोष्टी कायमच चर्चेचा विषय ठरतात. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून डॉ. रोहित शिंदे हा बाहेर पडला. यानंतर त्याने रुचिरा जाधवला घरात पाठिंबा न देण्याबद्दल भाष्य केले.सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची चर्चा आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या स्पर्धेत टॉपमध्ये असल्याचे पाहायला मिळतो. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून डॉ. रोहित शिंदे हा बाहेर पडला. यानंतर त्याने रुचिराने केलेल्या अनेक आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिले. यावेळी त्याने रुचिराला पाठिंबा देण्याबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केले आहे.

दरम्यान बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाले. त्यांच्यात वाद देखील झाला. अशातच रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यामधला वाद आणखी चिघळला. कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने