मृणाल म्हणते,"बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड परवडलं!"

मुंबई: बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर. मृणाल गेल्या 10 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सन्मान मिळवण्यासाठी धडपडत आहे आणि आता तिच्या या प्रयत्नांना यश आले आहे. ‘सीतारामम’ चित्रपटातून तिचा अभिनय मोठ्या पडद्यावर झळाळून उठला आहे. ‘बाटला हाऊस’, ‘जर्सी’ आणि ‘सुपर 30’ यांसारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवणाऱ्या मृणाल ठाकूरचा सीताराममही चांगलाच गाजतोय.2012 मध्ये मृणाल ठाकूरने ‘मुझसे कुछ कहते हैं, ये खामोशियां’ या मालिकेतून कॅमेऱ्यासमोर आपले कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली. २०१८ साली ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटात ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसली.  त्यानंतर सुपर ३० सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे परंतु अजूनही मला बॉलिवूडने योग्य भूमिका मिळत नाही असं म्हणत तिने या बद्दल नारागी व्यक्त केली आहे.ती म्हणते की, ऑगस्टमध्ये 'सीतारामम’ रिलीज झाल्यानंतर अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. परंतु मला सीताप्रमाणेच प्रमुख पात्रं साकारायची आहेत. मला मुख्य भूमिकेत काम करायचे आहे, कारण आपण सहकलाकार म्हणून काम केले तर आपली ओळख जास्त होत नाही मग आपल्याकडे सहकलाकार म्हणूनच बघितलं जातं आणि अश्याच भूमिका दिल्या जातात.आता मला समजले प्रेक्षकांना दिवसेंदिवस साऊथ फिल्म इंडस्ट्री का आवडतं आहे, कारण तिथे तुम्हाला मुख्य भूमिका दिल्या जातात. मला कामाची आवड आहे आणि माझ्यामध्ये ते स्किल आहे ,पण मला बॉलिवूडमध्ये योग्य भूमिका मिळत नाही आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने