जेव्हा शिव बिग बॉसच्या स्पर्धकाला चावला! चाहतेचं नव्हे तर बिग बॉसही सपोर्टला..व्हिडिओ व्हायरल

मुंबई: रिअलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये शिव ठाकरेची हवा आहे. तो त्याच्या दिलखूलास स्वभावाने प्रेक्षकांच मन जिंकत आहे. त्याला प्रेक्षकांचंही भरभरुन मतं मिळतं आहे. बिग बॉसच्या शेवटच्या एपिसोडमधील सर्वात चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 2 मधील शिवचं वागणं...वाईल्ड कार्ड स्पर्धक विकासने याची सुरवात केली.त्याने शिवाच्या विरोधात घरात अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामूळं प्रकरण इतक वाढलं की शेवटी बिगबॉसलाच शिवच्या बाजूने बोलावं लागलं. त्याच झालं असं की, की विकास अर्चनाला सांगतो की, शिवला तिच्याशी मैत्री करायची आहे, असं केल्यास त्यांला जास्त मतं मिळतील. यानंतर विकासने जुन्या गोष्टी उकरुन काढण्यास सुरुवात केली.तो अर्चनाला सांगतो की, 'शिव बिग बॉस मराठी सीझन 2 मध्ये असताना त्याने एका स्पर्धकाला चावा घेतला होता. त्यामूळं बराच गोंधळ झाला होता. त्यानंतर शिव घरात राहिल की नाही हा निर्णय त्या स्पर्धकावर सोडला. त्यावेळी त्याने शिवला माफ केले, परंतु जेव्हा तुझ्याबरोबर असाच प्रसंग घडला तेव्हा त्यानी तुला घराबाहेर हाकलून देण्याचा निर्णय घेतला.' हे ऐकल्यानंतर अर्चना चांगलीच संतापते!यानंतर विकास हेच प्रियांकाला, टीना आणि शालीन यांच्यासमोरही बोलतो. शिवच्या पुढच्या चालीबद्दलही तो बोलतो. तो म्हणतो की तो भोळा वागत असला तरी आतून सगळा खेळ खेळतो. दुसरीकडे अर्चनाने शिवला विचारते की, 'तुझ्याकडूनही हीच चूक झाली होती, पण तुला माफ करण्यात आलं , पण माझ्यावेळी तू का माफ केलं नाहीस?' यावर शिव स्पष्टीकरण देत असतांनाच बिग बॉसने त्याला अडवतो आणि सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावतो त्यानंतर बिग बॉस विकासची चांगलिचं खरडपट्टी काढतो.दरम्यान आता शिवचा तो जूना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो टास्कदरम्यान इतर स्पर्धकांना चावतांना दिसत आहे. मात्र शिवचे चाहते शिवला पाठींबा देतांना दिसताय. सध्या शिव ठाकरे ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. बिग बॉसने तत्काळ विकासला थांबवून फटकारल्याने शिवचे चाहते खूश आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने