पहिल्याच दिवशी अजित पवारांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापलं, म्हणाले...

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार कायमच आपल्या आक्रमक, सडेतोड बोलण्यातून ओळखले जातात. ते कायमच विरोधी नेत्यांवर आपल्या आक्रमक शैलीत कोंडीत पकडताना दिसून येतात. परंतु यावेळी त्यांची एक वेगळीच झलक दिसून आली आहे.आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी सभागृहाबाहेर अजित पवारांचं वेगळं रूप पाहायला मिळालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते यांनी शिंदे सरकार मधील मंत्रिमंडळालाच झापलं.


अधिवेशनात काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाचं चिन्हं असलेले बिल्ले लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार चांगलेच संतापले. ते म्हणाले मंत्र्यांनी असे पायंडे पाडू नका. एकनाथ शिंदे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात पक्षाचे नाही. नरेंद्र मोदी देखील पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हाच बिल्ला लावतात. त्यामुळे तुम्हा कोणत्याही प्रकारचा पायंडा पाडू नका.मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. मंत्रीही राज्याचे असतात. ते एखाद्या पक्षाचे मंत्री नसतात. असं असताना आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचं चिन्हं लावून सभागृहात कोणी येत नाही. असं चालू राहिलं तर सभागृहात बेशिस्त वाढेल. अजित पवारांच्या आव्हानाल मविआ आघाडीतील नेत्यांनी बाक वाजवून समर्थन केले.

तर त्यांनी अपल्या शैलीत सहकारमंत्री अतुल सावे यांना झापलं अजित पवार आपल्या खास अंदाजात अतुल सावे यांना म्हणतात की, "सावे साहेब तुम्ही मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदलला आहात की, मी देवेंद्रजींना अनेकदा सांगतो की, सावे साहेबांना सांगा इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. सत्ता येत असते, सत्ता जात असते.माणसं जोडायची असतात. त्यावर अतुल सावे म्हणतात की तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे ते." त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने