'सगळं ओक्के, पण बसायचं कुठे?' थर्टी फर्स्टसाठी जोरदार तयारी

मुंबई: सरत्या वर्षाला उत्साहात निरोप देण्यासाठी आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारे शक्य तितक्या आनंदात, जल्लोषात जुन्या वर्षाला अलविदा करण्यासाठीचे प्लँनिंग आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यत अनेकांनी यादिवसाचे शेड्युल वेल प्लॅन केल्याचे दिसून येते आहे.सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे...निमित्त कशाचेही असो...असं आपल्याकडे म्हटले जाते. जसं की शादी किस की भी हो, दिवाना नाचेगा और गायेगा भी...यानुसार पार्टीसाठी आपल्याला कोणतंही निमित्त पुरते. सध्या तरी सोशल मीडियावर ३१ डिसेंबरच्या पार्टीचे वेगवेगळ्या प्रकारे नियोजन सुरु झाले आहे. त्यावर व्हायरल झालेले मीम्स मात्र कमालीचे भन्नाट आहेत.आपल्या मनातील आनंद, उत्साह आणि यादिवशी होणाऱ्या पार्टीसंबंधीच्या भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाईनं काही मराठी गाण्यांचा आनंद घेतला आहे. काहींनी हिंदी चित्रपटातील डायलॉगचा वापर करुन गंमतीदार मीम्स व्हायरल केले आहेत. यापैकी काही उदाहरणं द्यायची झाल्यास, अगं ये चिमणे....काय रे चिमण्या....हा बघ आणला आहे मोत्याचा दाणा....पण ठेवायचा कुठे... याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स तयार करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.विशेषत अनेकांनी थर्टी फर्स्टच्या निमित्तानं बाहेर जाण्याचे प्लॅनिंग केले आहे. एककीडे बॉलीवूडचे सेलिब्रेटी परदेशात न्यु इयर सेलिब्रेशन करण्यासाठी जात असताना सर्व सामान्य लोकांनी देखील या दिवसासाठी जय्यत तयारी केली आहे. काहींनी धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे प्लॅन केले आहे तर काहींनी नव्या वर्षात कोणत्या नव्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याचा प्लॅन शेयर केल्या आहे.

मात्र यासगळयात चर्चा रंगली आहे ती थर्टी फर्स्टच्या पार्टीची. या दिवसाच्या निमित्तानं सुरक्षेच्या कारणास्तव कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाठाळ आणि तळीरामांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. अशावेळी नागरिकांनी सेलिब्रेशन करताना आपल्या उत्साहामुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने