अभिजीत बिचुकले दात घासत नाही आणि वॉशरूममध्ये तर.. राखी सावंतने सांगितलेला किस्सा ऐकाच..

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहे. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती... काय करेल याचा नेम नाही. तिच्या वागण्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. राखीने या आधी बिग बॉस 15 हिंदीही गाजवलं आहे. यावेळी तिच्या सोबत अभिजीत बिचुकले होता. त्याचेच काही भन्नाट किस्से राखीने बिग बॉस मराठीमध्ये उघड केले आहेत.राखीने स्पर्धकांसोबत गप्पा मारताना 'बिग बॉस -15' च्या घरात बिचकुलेच्या काही आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, 'अभिजीत बिचुकले फार लोकप्रिय होता. पण तो हा शो जिंकू शकला नसता. कारण तो दिवसभर झोपून असायचा. कोणत्याही टास्क किंवा खेळात तो सहभाग घ्यायचा नाही.पुढे ती म्हणाली, 'अभिजीत बिचुकलेला घरातील वॉशरुम वापरायचं असायचं, तेव्हा तो घरातील सगळ्या सदस्यांना वॉशरुममधून बाहेर काढायचा. तो दिवसभर दातही घासायचा नाही आणि माझ्या तोंडातून बासुंदीचा वास येतो, असं सगळ्यांना सांगत सुटायचा.'पुढे तिने एक धक्कादायक किस्साही सांगितला. ती म्हणाली, 'आमच्याबरोबर देवोलीना भट्टाचार्जीही होती. ती अभिजीतची सगळी कामं करायची. त्याच्यासाठी ती जेवणही बनवायची. पण, बिचुकलेने सर्वात आधी तिलाच नॉमिनेट केलं होतं. मी तुमची बेस्ट फ्रेंड आहे,मग मलाच का नॉमिनेट करताय, असं देवोलिना बिचुकलेला विचारलं तेव्हा बिचुकले तिला म्हणाला होता, मग काय झालं, मी तुलाच नॉमिनेट करणार. तू घराच्या बाहेर निघ.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने