“माझ्या आईला ती…” अभिषेक बच्चनने केला ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दल खुलासा

मुंबई: सासू-सून म्हटलं की भांड्याला भांड लागणार हे समीकरण ठरलेलंच असतं. अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरात सासू-सुनेचे नातं नेमकं कसं असेल असा विचार अनेकांना पडताना दिसतो. नुकतंच महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने पत्नी ऐश्वर्या राय आणि आई जया बच्चन यांच्यातील नाते कसे आहे याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. मात्र अजूनही त्यांच्यातील प्रेम हे कायम आहे. ऐश्वर्या राय आणि जया बच्चन या एकमेकांच्या सासू-सुना असल्या तरी त्यांच्या कायमच एक घट्ट नातं पाहायला मिळते. त्या दोघीही कायमच एकमेकांच्या जवळ असतात. नुकतंच एका मुलाखतीत अभिषेकला त्याची आई आणि पत्नी यांच्यातील नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने फार स्पष्टपणे उत्तर दिले.“माझी पत्नी आणि आई यांच्यात फार घट्ट नातं आहे असं मला वाटतं. त्या दोघी अनेक गोष्टींवर सातत्याने गप्पा मारत असतात. आता आई तिच्यावर पटकन कोणत्याही गोष्टींबद्दल विश्वास टाकते. आईचे आणि तिचे नाते फारच चांगले आहे.जेव्हा एखादी मुलगी लग्न करुन नवऱ्याच्या घरी येते तेव्हा तिला साहजिकच एकटं एकटं वाटत असतं. ती त्या घरातील नाही, असेही तिला अनेकदा वाटते. पण लग्न झालेल्या मुलीच्या मनातील ही धाकधूक फक्त एकमेव व्यक्ती घालवू शकते ती म्हणजे सासू. सासू स्वत: या गोष्टीतून गेलेली असते. त्यामुळे तिला याबद्दल कल्पना असते. तिलाच हे उत्तम जमू शकते आणि माझ्या आईने ते केले आहे, असे मला तरी वाटते”, असेही अभिषेक बच्चन म्हणाला.  

“माझी पत्नी आणि आई यांच्यात फार घट्ट नातं आहे असं मला वाटतं. त्या दोघी अनेक गोष्टींवर सातत्याने गप्पा मारत असतात. आता आई तिच्यावर पटकन कोणत्याही गोष्टींबद्दल विश्वास टाकते. आईचे आणि तिचे नाते फारच चांगले आहे.जेव्हा एखादी मुलगी लग्न करुन नवऱ्याच्या घरी येते तेव्हा तिला साहजिकच एकटं एकटं वाटत असतं. ती त्या घरातील नाही, असेही तिला अनेकदा वाटते. पण लग्न झालेल्या मुलीच्या मनातील ही धाकधूक फक्त एकमेव व्यक्ती घालवू शकते ती म्हणजे सासू. सासू स्वत: या गोष्टीतून गेलेली असते. त्यामुळे तिला याबद्दल कल्पना असते. तिलाच हे उत्तम जमू शकते आणि माझ्या आईने ते केले आहे, असे मला तरी वाटते”, असेही अभिषेक बच्चन म्हणाला.  दरम्यान अभिषेक ऐश्वर्या या दोघांची ओळख पहिल्यांदा ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर २००० साली झाली होती. त्यावेळी दोघंही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. पण २००६- २००७ च्या दरम्यान गुरू चित्रपटाच्या सेटवर या दोघांमधील जवळीक वाढली. याच चित्रपटाच्या टोरंटो प्रिमियरच्या वेळी अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज केलं. या दोघांनी ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘गुरू’ आणि ‘धूम २’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने