हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या पैलवानांवर कारवाई होणार

मुंबई: हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचा महाराष्ट्रातील मल्लांना इशारा दिला आहे. हिंदकेसरी खेळणाऱ्या पैलवान यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात समितीने जाहीर पत्रदेखील जाहीर केलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी पत्र जाहिर केलं आहे.
काय म्हटलं आहे पत्रात?

भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -२०२३ आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये जर महाराष्ट्रातले पैलवान खेळले किंवा पंच तसेच पदाधिकारी तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अस्थाई समिती कारवाई करणार असे पत्रात नमूद केले आहे.भारतीय शैली कुस्ती महासंघ व भारतीय कुस्ती संघ, हे दोन वेगवेगळे देशस्तरीय कुस्ती संघ आहेत. हिंदकेसरी हे टायटल वापरण्याचा अधिकार भारतीय शैली कुस्ती महासंघाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने