'मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तर..', मुलीसोबत सुट्टीवर गेलेली मधुराणी कोणावर भडकली?

मुंबई : सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका अनेक रंजक वळणांवरनं प्रवास करत आहे. मालिकेमुळे मधुराणीची चर्चा नेहमी सुरुच असते पण आता सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. सध्या मधुराणी आपल्या मुलीसोबत नाताळची सुट्टी एन्जॉय करताना दिसतेय. तिनं तसे आपले फोटोही छान-छान पोस्ट केले होते. पण तिच्या या आनंदात कोणीतरी आडकाठी आणली अन् यामुळे अभिनेत्रीचा पारा चढला.मधुराणी सध्या आपल्या मुलीसोबत शूटिंगमधनं वेळ काढत सुट्टीचा आनंद घेतेय. तिनं सोशल मीडियावर छान छान फोटो पोस्ट केले होते. पण याच तिच्या फोटोवर आक्षेप घेत एका नेटकऱ्यानं कमेंट केली अन् तिथून सुरु झालं तू-तू..मै-मै. अर्थात या वादात मधुराणीच्या चाहत्यांनीही उडी घेतल्यानं वाद बराच रंगला. चला जाणून घेऊया नेमकं घडलं काय.मधुराणीनं आपल्या मुलीसोबतचे काही फोटो पोस्ट केलेयत. ज्यात तिनं जीन्सची पॅंट आणि छान गुलाबी रंगाचा टी-शर्ट असा पेहराव केला आहे. तिच्या कपाळावर तिनं बिंदी लावलेली नाही. तिचे केेस तिनं मोकळे सोडले आहेत. अर्थात या लूक मध्ये ती सुंदरच दिसत आहे.पण एका नेटकऱ्याला मात्र तिचा हा पेहराव खटकला. अन् त्यानं तिच्या त्या फोटोवर कमेंट करत लिहिलं की,''सभ्य भूमिका केल्यानंतर मॉडर्न लुक मधील फोटो काढून शेअर करण्याचे काय कारण आहे? विवाहित स्त्रिया काहीही असो कुंकू लावतात''.

''आणि कुंकू लावल्यामुळे त्यांना कोणी मॉडर्न रोल देणार नाही असे नाही. मालिकेत सभ्य भूमिका केल्यानंतर त्यांच्या आपल्या मुलींना असा आदर्श घालून देणे हे कितपत योग्य आहे? दाक्षिणात्य अभिनेत्री त्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषा वैयक्तिक आयुष्यात प्रकर्षाने पाळतात''.आता नेटकऱ्यांची ही कमेंट वाचून मधुराणीनं मात्र चांगलाच पलटवार केला आहे. तिनं लिहिलंय की,''मी वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मला सांगणारे तुम्ही कोण? मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तुम्हाला मग तुम्ही पाश्चात्य लोकांचा ब्लेझर घालून फोटो का काढलाय? मराठी पेहराव करायला हवा होतात न...''

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने