राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल बिग बॉसच्या घरात.. केलं मराठीत प्रपोज..

मुंबई: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहे. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती... काय करेल याचा नेम नाही. तिच्या वागण्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. पण आज राखी काहीशी रोमॅंटिक होताना दिसणार आहे. कारण आज तीचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रांनी तिला भेटायला बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे. राखीसाठी ही एक मोठं सरप्राइज असणार आहे.बिग बॉसचं घर सध्या भावनिक झालं आहे. कारण 80 दिवस घरच्यांच्या कोणत्याही संपर्काशिवाय बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या घरचे काही क्षणासाठी भेटायला येत आहेत. त्यामुळे एरव्ही भांडणारे कलाकार ही हळवे होऊन रडत आहेत. पण सगळ्या स्पर्धकांचे नातेवाईक भेटायला येत असताना राखीने मात्र आपली खंत व्यक्ती केली होती.नुकतीच राखी याविषयाला घेऊन भावूक झाली होती, कारण राखीने या आधी बिग बॉसचे बरेच सीजन केले आहेत. पण आजवर तिला कधीही कुणीही भेटायला आलं. त्यामुळे आताही येणार नाही. सगळ्यांच्या घरचे येतात, पण माझ्यासाठी कुणी नाही.. म्हणूनच मी इतकी खंबीर आहे.. असं ती म्हणाली होती. पण तिचे ही स्वप्न बिग बॉस मराठीच्या घरात पूर्ण होणार आहे.नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये राखीला बिग बॉस म्हणतात राखी तुमच्या घरून कुणीही तुम्हाला भेटायला आलं नाही. त्यावर राखी म्हणजे मला माहीत होतं, असंच होणार आहे. पण अचानक एक दरवाजा उघडून तिचं बॉयफ्रेंड आदिल खान बिग बॉसच्या घरात येतो आणि तिच्यापुढे उभा राहतो. आणि चक्क तिला मराठीत प्रपोज करत म्हणतो 'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'.. हे सगळं पाहून राखी भारावून जाते आणि म्हणते असं आजवर कधीही झालं नव्हतं.. त्यावर अपूर्वा म्हणते.. हे बिग बॉस मराठीचं घर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने