भारतात 'पठाण'ची हवा टाईट, परदेशात मोठी फाईट..

मुंबई:   शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटा संदर्भात सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. 'बेशरम रंग' गाण्यांमध्ये दीपिका पदुकोणने घातलेली केसरी रंगाची बिकिनी यावरनं प्रचंड वाद झाला. चित्रपट बॉयकॉटची करण्याची मागणी केली गेली.. इतकेच नव्हेतर शाहरूखला जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. पण जर्मनीमध्ये मात्र पठाण चित्रपटांची अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू असल्याचं दिसून आलं आहे.जानेवारीमध्ये शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट येणार आहे . किंग खान 4 वर्षांनंतर कमबॅक करत आहे. त्यामुळे शाहरूखच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 28 डिसेंबरपासून जर्मनीमध्ये 'पठाण' अॅडव्हान्स बुकिंग ची आगाऊ बुकिंग सुरू झाली. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून एक महिना बाकी आहेत. पण शोची तिकिट विक्री आधीच सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगनं तिथे रेकॉर्ड केल्याचं बोललं जात आहे.भारतात 'पठाण' चित्रपटाला घेऊन अनेक राजकीय पक्षांनी आणि हिंदू संघटनांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही असा रट्टा लावला आहे आणि एकीकडे बाहेरच्या देशात आधीच बुकिंग चालू आहे हे पाहून निर्मात्यांसोबतच व्यापारी तज्ज्ञही खूश आहेत. यावरून असे दिसून येते की पठाण चित्रपटांबद्दल बाहेरच्या देशात आधीच उत्सुकता आहे.

जर्मन मल्टिप्लेक्स साखळीच्या वेबसाइटवर नजर टाकल्यानंतर असे दिसून आले की चित्रपटाची तिकीट विक्री सुरू झाली आहे. बर्लिन, एसेन, डॅमटोर, हार्बर, हॅनोव्हर, म्युनिक आणि ऑफेन बँक येथील 7 सिनेमागृहांमध्ये बुधवार, 25 जानेवारीला पठाणचे शो फुल झाले आहेत. देशात असो किंवा परदेशात, किंग खानचे चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झालेयत.भारतात अडव्हान्स बुकिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स निर्मित 'पठाण' 25 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने