एड्स होण्यापासून आपण स्वतःला कसे दूर ठेऊ शकतो?

दिल्ली: दरवर्षी दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. एड्स सारख्या जीवघेण्या आजाराविषयी जनजागृती करणे, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचे घोषित केले होते. त्यामुळे 1988 पासून जगभरात एड्स दिवस साजरा करतात.एड्स या आजाराविषयी अनेकांच्या मनात गैरसमज आहे. त्यामुळे एड्सविषयी असलेले गैरसमज त्वरीत दूर करणे गरजेचे आहे. जसे की हात मिळवणे, मिठी मारणे, चुंबन, शिंका येणे, स्पर्श करणे, समान शौचालय वापरणे, एकच टॉवेल वापरणे, एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीचे लाळ, अश्रू, मल आणि मूत्र याद्वारे एचआयव्ही कधीच पसरत नाही.  त्यामुळे तुमच्या आजुबाजूला कुणालाही हा आजार झाला तर हे गैरसमज मनात बाळगू नका.



एड्स होण्यापासून आपण स्वतःला कसे दूर ठेऊ शकतो?

  • एड्सची लक्षणे दिसतातच त्वरीत HIV टेस्ट करुन घ्यावी.

  • कुणालाही सेक्सुअली ट्रान्समीटेड डिसीज असेल त्यांना एड्सची लागण लवकर होण्याची शक्यता असते.

  • सेक्स एज्युकेशनविषयी जाणून घ्यावं

  • कंडोमचा वापर कसा करावा, हे सुद्धा जाणून घ्यावे

  • एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारिरीक संबंध ठेवू नये.

  • वापरलेले इंजेकशन किंवा दाढी करताना वापरलेल्या ब्लेडचा पुन्हा वापर तर होत आहे का, याची काळजी घ्यावी.

  • केवळ अधिकृत व मान्यताप्राप्त रक्तपेढ्यांमधूनच सुरक्षित रक्त घ्यावे

  • एचआयव्ही पॉझिटिव्ह गर्भवती आईने बाळाना संक्रमन होऊ नये यासाठी समुपदेशन घेणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने