आयएएस अधिकाऱ्याच्या पतीनं बळकावलं माझं शेत! लकी अलीची तक्रार

मुंबई: प्रसिद्ध गायक लकी अली हा बॉलीवूडमधील सदाबहार गायक. ९० च्या दशकांपासून त्यानं आपल्या हटक्या गायन शैलीनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. सध्या लकी अली हा त्याच्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं फेसबूकवरुन लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या शेतजमिनीवर एका भुमाफियानं त्याच्या आयएएस पत्नीच्या मदतीनं हक्क सांगितल्याची तक्रार त्यानं केली आहे.लकी अलीची बंगळुरुमध्ये शेतजमीन आहे. ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याविषयी लकी अलीनं फेसबूकवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, ती जमिन माझी आहे आणि त्या एका भुमाफियानं त्याच्या सनदी अधिकारी पत्नीच्या मदतीनं ती जमिन बळकावली आहे. एवढेच नाही तर त्यानं त्या जमिनीवर त्या दोघांनी आपला हक्क सांगितला आहे.याबाबत लकी अलीनं पोलिसांकडे धाव घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत असून त्यावर लकी अलीनं सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. लकी अलीन सोशल मीडियावर त्या भुमाफियाला काही प्रश्न विचारले आहेत. बंगळुरुमध्ये असणाऱ्या आपल्या शेतजमिनीवर त्या माफियानं हक्क सांगितला असून त्या कामी त्याला त्याची आयएएस पत्नी मदत करत असल्याचेही लकी अलीनं सांगितलं आहे. ही पोस्ट व्हायरल होताच त्याला त्याच्या चाहत्यांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.मागील ५० वर्षांपासून माझी ज्या जागी शेतजमिन आहे. आणि आता काही नवीन लोकं तिथं जावून त्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना अटकाव करायला गेल्यास ते धमकी देतात. यावर मला न्याय हवा आहे. असे लकी अलीनं म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने