एसआरके छक्का.. म्हणणाऱ्याला शाहरूख खानने दिलं सडेतोड उत्तर

मुंबई:  सध्या 'पठाण' चित्रपट जोरदार चर्चेत आहे. ह्या चित्रपटाच्या वादाने नुसता धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नाही. याच वादादरम्यान शाहरुखचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख वर घाणेरड्या भाषेत टीका करण्यात आली आहे तर शाहरुखनेही ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.शाहरुख खान त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटातून 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी शाहरूख 'झिरो' चित्रपटात दिसला होता. एकीकडे चाहते त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत तर दुसरीकडे पठाण चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटाबाबत शाहरूख खानला प्रचंड ट्रोल केले जात आहे. या सगळ्यामध्ये आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व एका शोचा थ्रोबॅक व्हिडिओ आहे ज्यामध्ये किंग खान जितेंद्र कुमार आणि निधी बिश्तसोबत बसलेला दिसत आहे. शाहरुख त्याच्या फोनकडे बघून लोकांच्या कमेंट्स वाचतोय, मग त्याची नजर अशा कमेंटवर पडते जिथे जितेंद्र कुमार आणि निधी बिश्त शांत होतो. या कमेंटमध्ये 'एसआरके छक्का' असं लिहिलं आहे.ही कमेंट पाहून शाहरुख मात्र भन्नाट उत्तर देतो. शाहरूख म्हणतो, 'मी इतका मोठा आहे की मी चौकार, किंवा रन वगैरे मारत नाही... मी फक्त सिक्स मारतो..' शाहरुख खानची ही उत्तर देण्याची स्टाईल चाहत्यांनाही आवडली आहे. लोकांनी या व्हिडिओवर कमेंट करून त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक केले आहे.किंग खानच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण'मध्ये शाहरुखशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने