गौहर खानने दिली गुड न्यूज.. 39 व्या वर्षी होणार आई..

मुंबई: सध्या बॉलीवूडमध्ये अत्यंत आनंददायी वातावरण आहे. कारण रोज काहीतरी गोड बातमी समोर येत आहे. कुणी प्रेगनन्सीची न्यूज देत आहे तर कुणी मुलगा- मुलगी झाल्याची खबर. काजल अग्रवाल, सोनम कपूर, आलिया भट्ट आणि बिपाशा बासू या सगळ्या अभिनेत्री नुकत्याच आई झाल्याने त्यांच्या मातृत्वची चर्चा आहेच. अशातच बिग बॉस विजेती आणि मॉडेल गौहर खान नेदेखील गोड बातमी दिली आहे.गौहर खानच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. गौहर खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. गौहर खान आणि जैद दरबार 25 डिसेंबर 2020 रोजी विवाह बंधनात अडकले. लॉकडाऊनच्या वेळी गौहर खान आणि जैद दरबारची भेट झाली, त्यानंतर त्यांची मैत्री सुरू झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर कधी झाले हे कळलेही नाही आणि दोघांनी लग्न केले आणि तब्बल दोन वर्षांनी त्यांनी गुड न्यूज दिली.जैद दरबारचे वडील इस्माईल दरबार हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. तर आपण गौहर खानने बिग बॉसचा 7 वा सीझनची विजेती होती. गौहर खान सध्या प्रेग्नंट आहे आणि हे सांगण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर एक अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने चाहत्यांना सांगितले की ती आणि तिचा पती जैद दरबार दोनाचे तीन होणार आहेत.गौहर खानने इंस्टाग्रामवर एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये जैद दरबार आणि गौहरचे अॅनिमेटेड वर्जन कॅरेक्टर आहेत. ते बाईकवर जाताना दिसत आहेत. आणि सोबत लिहिले आहे की, "जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एकाचे दोन झालो आणि आता हा प्रवास पुढे सरकत आहे.. आता आम्ही दोनाचे तीन होणार आहोत." दोघांचेही चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने