आता विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची होणार कोरोना टेस्ट; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: कोरोनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. चीननंतर इतर देशांसह भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट केलं आहे. राज्यात पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आल्या आहेत. टेस्टिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर देशातून आलेल्यांची विमानतळावर टेस्टिंग करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबबातचे आदेश दिलेत. केंद्र सरकारने राज्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर आनंदाची बाब म्हणजे राज्यात सद्यपरिस्थितीत कोणताही नवा कोरोनाचा व्हेरिएंट आढळलेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. त्याचबरोबर आरोग्य विभाग खबरदारी घेत आहे. टेस्टिंग डिपार्टमेंटला तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेत, असंही तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.पुढे बोलताना सावंत म्हणाले की, तालुका पातळीपासून ते महानगर पालिकेतील सर्व आरोग्य यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

तर आरोग्य भरती करण्यावरही आमचा भर आहे, असंही सावंत यांनी सांगितलं आहे.तर फक्त चीनमधूनच नाही तर आपल्या देशात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची विमानतळावर थर्मल टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आलेत. आपल्या देशातून कोणी परदेशात गेलं आणि परदेशातून आल्यावरही त्यांची टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही सावंत यांनी दिले आहेत.त्याचबरोबर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रातील लोकांची इम्युनिटी चांगली आहे, त्यामुळे घाबरण्याचं काहीचं कारण नाही. मास्क घालणं बंधनकारक करायचं की नाही यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतनंतर निर्णय घेऊ, अशी माहितीही सांवत यांनी यावेळी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने