श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांना मोठं यश; महत्वाचा पुरावा हाती

दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय.या प्रकरणातील आरोपी आफताबचा ऑडिओ  दिल्ली पोलिसांना मिळालाय. या ऑडिओमध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत असून या दोघांत मोठा वाद सुरुय. अशा स्थितीत आफताब श्रद्धावर अत्याचार करत होता, याचा अंदाज लावता येईल.



मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस  या ऑडिओला मोठा पुरावा मानत आहेत. या ऑडिओमुळं हत्येचा हेतू स्पष्ट होईल, असं तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यासोबतच, या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळण्यासाठी दिल्ली पोलीस आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत. सीबीआयची सीएफएसएल टीम सोमवारी आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आफताब पूनावालावर श्रद्धाच्या हत्येचा आरोप आहे. 12 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली त्याला दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात अटक केली होती. आफताबनं श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. नंतर ते तुकडे अनेक दिवस घरी फ्रीजमध्ये ठेवले. 18 मे 2022 रोजी संध्याकाळी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची आफताबनं गळा आवळून हत्या केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने