मस्जिद-ए-अयोध्येचे बांधकाम 'या' तारखेपासून सुरू होणार, हिंदूंचेही आहे योगदान

अयोध्या: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत भव्य राम मंदिराचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदीर आणि बाबरी मशिदीचा वाद सुरू होता. अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाबरोबरच लवकरच आता येथे मस्जिद-ए-अयोध्येच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. या मस्जिदीसाठी हिंदू बांधवही मोठ्या संख्येने योगदान देत आहेत.इंडो-इस्लामिक कल्चरल ट्रस्टचे सदस्य अर्शद अफजल म्हणाले की, "मस्जिद-ए-अयोध्याच्या बांधकामाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या वर्षी डिसेंबर २०२२ पर्यंत मशिदीचा नकाशा मंजूर केला जाईल. यानंतर 26 जानेवारी 2023 पासून मस्जिद-ए-अयोध्येचे बांधकाम सुरू केले जाईल.मशिदीसाठी ५ एकर जागा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात मशिदीसाठी ५ एकर जमीन दिली आहे. जमिनीच्या वाटपानंतर, मे २०२१ मध्ये इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने मशिदीच्या नकाशाच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. मात्र, एनओसीअभावी अद्यापपर्यंत त्याला मंजुरी मिळालेली नाही.

नकाशाला मंजुरी न मिळण्याची मुख्य कारणे

मस्जिद-ए-अयोध्येचा नकाशाला आतापर्यंत मंजुरी न मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे मशिदीसाठी देण्यात आलेली जमीन ही शेतजमीन आहे. त्यानंतर आता या जमिनीचा वापर दुसऱ्या गोष्टीसाठी केला जाणार आहे. बांधकामापूर्वी मशिदीच्या जमिनीचा वापर बदलणे आवश्यक आहे.याशिवाय दुसरे कारण म्हणजे अग्निशमन विभागाचा आक्षेप. वास्तविक, मशिदीकडे जाणारा मार्ग केवळ ६ मीटर रुंद असल्याचा आक्षेप अग्निशमन विभागाचा होता. मात्र, भविष्यात हा रस्ता १२ मीटर रुंद करण्यात येईल, या अटीवर अग्निशमन विभागाने याला एनओसी दिली आहे. मस्जिद-ए-अयोध्येसाठी मुस्लिमांसोबतच हिंदूही मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत. या मशिदीच्या बांधकामासाठी लखनौ, अयोध्यासह अनेक ठिकाणांहून सहकार्य मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने