शालेय विद्यार्थ्यांना मिळणार भगवद्गीतेचे धडे; लोकसभेत महत्त्वपूर्ण माहिती

दिल्ली: शालेय पाठ्यपुस्तकात कोणते धडे असावे यात राजकीय सत्ता कोणाची, त्यानुसार बदल कायमच दिसून आलेले आहेत. राजकीय व्यक्तीमत्व, ऐतिहासिक व्यक्ती, इतिहास या सगळ्यात ते डोकावतं असं आपण कायमच बघत आलेलो आहोत. आता शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना हिंदू धर्मग्रंथाचे धडे दिले जाणार आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार भगवद्गीतेचे धडे

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इयत्ता सहावी आणि सातवीमधील श्रीमद भगवद्गीतेचे संदर्भ आणि इयत्ता अकरावी आणि बारावीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकांमध्ये त्यातील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती सोमवारी लोकसभेत देण्यात आली.एका लेखी उत्तरात, शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क विकसित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विविध मंत्रालये, विभाग, राज्ये आणि राज्यांसह विविध केंद्रशासित प्रदेशांतून इनपुट आमंत्रित केले जात आहेत.समिती स्थापन

मंत्रालयाने 2020 मध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) च्या सर्व पैलूंवर अभ्यास व्हावा, आंतरविद्याशाखीय आणि ट्रान्स-डिसिप्लिनरी संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी एका विभागाची स्थापना झाली. यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) मध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) विभागाची स्थापना केली होती. पुढील संशोधन आणि सामाजिक अनुप्रयोगांसाठी IKS माहिती जतन आणि प्रसारित करत आहे.

संसदीय पॅनल

एका संसदीय पॅनेलने एनसीईआरटीला ईशान्येसह देशाच्या सर्व कानाकोपऱ्यातील अनेक फारसे माहित नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्याची आणि समान जोर देऊन समाविष्ट करण्याची विनंती केली.

"वेद" आणि भगवद्गीतेच्या शिकवणींचा समावेश

शालेय अभ्यासक्रमात "वेद" आणि भगवद्गीतेच्या शिकवणींचा समावेश करण्याची नोंद पॅनेलने घेतली. अहवालात म्हटले आहे की, धार्मिक शिकवणींमधील विविधता अधोरेखित करण्यासाठी त्याचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात येणार आहे.शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कोणतेही चुकीचे संदर्भ जाऊ नये, गैर-ऐतिहासिक तथ्ये जाऊ नये, भारतीय इतिहासाच्या सर्व कालखंडासाठी संतुलित मांडणी असावी म्हणून समिती स्थापन करण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने