‘आरारारा खतरनाक’! अजयच्या 'भोला'चा लूक पाहून चाहते म्हणाले; 'हिरो की व्हिलन'

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण बॉक्स ऑफिसवर त्याची जादू दाखवण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्या दृष्यम २ या चित्रपटाने दमदार कमाई केली आणि आता तो नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.सध्या तो त्याच्या 'भोला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. ज्याला पाहिल्यानंतर त्याचे चाहते त्याच कौतूक करत आहेत. आता या चित्रपटाचं आणखी एक मोशन पोस्टर समोर आलंय. ज्यामध्ये अजय देवगणचा वेगळाच कडक लूक पाहायला मिळत आहे.अजय देवगण आणि तब्बूचा भोला 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. खुद्द अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या नव्या मोशन पोस्टरच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या मोशन पोस्टमध्ये, स्क्रीनवर लिहिले आहे - "एक चट्टान, सौ शैतान...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने