अंबानींचे अच्छे दिन! 'या' क्षेत्रातील कंपनी घेतली विकत; 'एवढ्या' कोटींची झाली डील

मुंबई: देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी एकापाठोपाठ एक मोठे सौदे करत आहेत.आता त्यांनी आणखी एक मोठी कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी जर्मन रिटेलर मेट्रो एजी कंपनीचा भारतातील व्यवसाय विकत घेतला आहे. हा सौदा 2,849 कोटी रुपयांना झाला आहे.मुकेश अंबानींचे रिटेल क्षेत्रातील व्यवसाय वाढवण्याच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्स लवकरच मेट्रो एजीचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने एकूण 344 डॉलर दशलक्ष मध्ये मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (मेट्रो इंडिया) मध्ये 100 टक्के इक्विटी स्टेक घेण्यासाठी करार केले आहेत.या कराराबद्दल रिलायन्स आणि मेट्रो ग्रुपमध्ये चर्चा सुरू आहे. या करारामध्ये मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मालकीची 31 घाऊक वितरण केंद्रे, जमीन, बँका आणि इतर मालमत्तांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यावेळी या डीलबाबत दोन्ही कंपन्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.

34 देशांमध्ये मेट्रो एजी व्यवसाय :

मेट्रो कॅश अँड कॅरीच्या ग्राहकांमध्ये किरकोळ विक्रेते आणि किराणा दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्स (HoReCa), कॉर्पोरेट, SME कंपन्या आणि संस्था यांचा समावेश आहे. मेट्रो एजी 34 देशांमध्ये आपला व्यवसाय करते आणि 2003 मध्ये भारतीय बाजारपेठेत कंपनीने प्रवेश केला होता.कंपनीची बेंगळुरूमध्ये सहा, हैदराबादमध्ये चार, मुंबई आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी दोन आणि कोलकाता, जयपूर, जालंधर, जिरकपूर, अमृतसर, अहमदाबाद, सुरत, इंदूर, लखनौ, मेरठ, नाशिक, गाझियाबाद, तुमाकुरू, विजयवाडा, विशाखापट्टणम, गुंटूर आणि हुबळीत प्रत्येकी एक स्टोअर आहे.

बुधवारी उशिरा कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, RRVL सोबतचा व्यवहार मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महत्त्वाचे म्हणजे 2021/22 या आर्थिक वर्षात मेट्रो इंडियाने सुमारे 7,700 कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती.कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतरचा हा आकडा सर्वात मोठा आहे. कंपनीच्या निवेदनात असे म्हटले आहे की, हा करार रिलायन्स रिटेलचे स्टोअर आणि पुरवठा नेटवर्क आणखी मजबूत करण्यासाठी काम करेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने