“तू हात उचलायच्या लायकीचा…” अक्षय व प्रसादमध्ये हाणामारी, धक्काबुक्की केली अन्…

 मुंबई : बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व आता रंगात आलं आहे. अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये मध्यंतरी जोरदार भांडण झालं. तर इतर सदस्यांमध्ये असलेले रुसवे-फुगवे प्रेक्षकांना काही नवे नाहीत. आता तर चक्क घरातील सदस्य हाणामारीवर उतरले आहेत. येत्या भागामध्ये प्रसाद जवादे व अक्षय केळकरमध्ये जोरदार भांडण रंगणार आहे.कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद व अक्षय एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले दिसत आहेत. कॅप्टन्सी टास्कनंतर दोघांमध्ये भांडण झालं असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.“स्वतः जेवला आहेस ना मग आमच्या भूकेचं काय करणार आहेस?” असं प्रसाद अक्षयला म्हणतो. यावर अक्षय म्हणतो, “कॅप्टन काय जेवण भरवणार का?” दोघांचाही राग अनावर होतो. “तो कोणाच्या बापाचा नोकर आहे का?” असं प्रसाद अक्षयला म्हणतो. यावरून अक्षयला राग अनावर होतो.अक्षय प्रसादला धक्का देतो. प्रसाद म्हणतो, “तू हात उचलायच्या लायकीचा राहणार नाहीस. तुला सणकन मारेन अशी…” प्रसादचा रुद्रावतार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर प्रेक्षकांनीही प्रसादचं कौतुक केलं आहे. जुना प्रसाद आता पुन्हा परतला आहे असं प्रेक्षक हा व्हिडीओ पाहून म्हणत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने