माझ्या बदनामीसाठी भाजपने ५ हजार कोटी खर्च केले, पण...; राहुल यांचा सनसनाटी आरोप

नवी दिल्ली : काँग्रेसनेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यांची भारत जोडो यात्रा लवकरच उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी सातत्याने भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहे. त्यातच आज राहुल गांधी यांनी भाजपवर सनसनाटी आरोप केला आहे.राहुल गांधी म्हणाले की, माझी बदनामी करण्यासाठी भाजपने ५ हजार कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर ९९ टक्के विश्वास ठेवत होतो. मात्र आता मला १०० टक्के खात्री आहे की, भाजपने बदनामीसाठी ५ हजार कोटी खर्च केले. मात्र सत्य लपविण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कँपियन चालवा, काहीही होणार नाही, असंही राहुल यांनी म्हटलं.राहुल पुढं म्हणाले की, मी बारकाईने निरक्षण केलं आहे. आता बदनामीसाठीचा खर्च ६ हजार कोटींवर पोहोचला आहे. आता आणखी थोडे खर्च करा. तुमच्याकडे पैशांची कमतरता नाही. मात्र त्याने आपल्याला काहीही फरक पडणार नाही, असंही राहुल यांनी ठणकावून सांगितलं.राहुल गांधी यांची प्रतिमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मलिन झाली आहे. राहुल यांना सातत्याने पप्पू म्हणून हिनवलं जातं. मात्र आज पहिल्यांदाच राहुल यांनी त्यांच्या बदनामीवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने