टाळ्यांच्या कडकडाटात जेव्हा त्या दिव्यांग तरूणी रॅम्पवर अवतरल्या...

गुजरात: इतरवेळी अंध व्यक्ती पाहुन नाकं मुरडली जातात. ते आपल्यावर अवलंबून आहेत याची जाणिव त्यांना प्रत्येकक्षणी त्यांना करून दिली जाते. पण, एका कार्यक्रमात जेव्हा अंध तरूणी रॅम्पवर उतरल्या तेव्हा प्रेक्षक त्यांच्याकडे पाहतच बसले. आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.गुजरातमध्ये आयोजित एका फॅशन शोमध्ये दिव्यांग मुलींनी रॅम्प वॉकवर उतरून एक नवा इतिहास रचला. या शोमध्ये अंध मुलींनी फॅन्सी ड्रेस, वन पिस परिधान करून रॅम्प वॉक केला. इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड ज्वेलरी डिझाईनने हा शो आयोजित केला होता.  
अंध मुलींनी शोमध्ये येण्यापूर्वी दोन आठवडे सराव केला. दृष्टिहीन मॉडेलपैकी एक असलेल्या जान्हवीने सांगितले की, शोच्या आधी आम्ही सुमारे दोन आठवडे सराव करत होतो. जेव्हा आम्ही प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकल्या, तेव्हा आम्हाला जाणवले की आम्ही चांगले काम केले आहे. आणि आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळाले. या मुलींची साथ देण्यासाठी पुरूष मॉडेल्सही त्यांच्यासोबत रॅम्पवर आले. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात तरूणी अधिक आत्मविश्वासाने रॅम्पवर उतरल्या.आयएफजेडीचे संचालक आणि शोचे आयोजक बोस्की नाथवानी मुलींच्या कामगिरीने खूप प्रभावित झाले. नाथवानी म्हणाले की, 'या मुली खूप मेहनत घेत आहेत. आज त्यांनी रॅम्पवर चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला हे त्याच्यासाठी कठीण होते, परंतु त्यांनी मेहनत घेऊन हे काम सोपे केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने