'मी तुझ्यासाठी...' उर्वशीला राहवेना, ऋषभसाठी नवं ट्विट!

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. यावर त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मात्र यासगळ्यात चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना उत्सुकता होती ती त्याची मैत्रीण उर्वशी त्याच्यासाठी काय पोस्ट करते याविषयी....
सध्या सोशल मीडियावर उर्वशीची दुसरी पोस्ट व्हायरल झाली आहे. ती व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. काल दिल्ली - डेहराडून हायवेवर ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांच्या काळजात धस्स झालं आहे. आता तो दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेतो आहे.सोशल मीडियावर यासगळ्यावर काय पोस्ट करते याची चाहत्यांना उत्सुकता होती. काल तर तिनं एक फोटो पोस्ट करुन आपण देवाला प्रार्थना करत असल्याचे म्हटले होते. मात्र तिचा जो फोटो होतो त्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. वहिनी परिस्थिती काय तुम्ही काय फोटो पोस्ट करता, अशा शब्दांत उर्वशीवर राग व्यक्त केला होती. त्यानंतर आता तिनं ट्विट केले आहे.

आपल्याला ट्रोल केले जात आहे लक्षात येताच उर्वशी पुन्हा ऋषभसाठी खास ट्विट केले आहे. त्यामध्ये ती त्याला म्हणते, प्लीज तू आता लवकर बरा हो...मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबियांसाठी देवाकडे प्रार्थना करते आहे. असे उर्वशीनं त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांना उर्वशीच्या प्रतिक्रियविषयी कमालीची उत्सुकता होती.नेटकऱ्यांनी त्या व्टिटवर देखील व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. एकानं लिहिलं आहे की, आता ऋषभ लवकर बरा होईल. त्याचे कारण उर्वशीनं त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने