'फ्रीडम ऑफ मिडनाईट' लिहिणारे डॉमनिक यांचे निधन

दिल्ली: प्रसिद्ध फ्रेंच लेखक डॉमेनिक लॅपियर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांवर आधारित पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. त्यांनी मोठा वाचकवर्ग जोडला होता. लॅपियर यांचे फ्रीडम ऑफ मिडनाईट हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले होते. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. एका रिक्षा चालकाच्या आयुष्यावर आधारित सिटी ऑफ जॉयलाही वाचकांनी डोक्यावर घेतले होते.फ्रीडम ऑफ मिडनाईटनं जगभर लोकप्रियता...

लॅपियर आणि कॉलिन्स यांनी लिहिलेलं फ्रीडम ऑफ मिडनाईट हे जगप्रसिद्ध झालं. त्याची पहिली आवृत्ती ही १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली होती. अजुनही त्याच्या आवृत्या प्रकाशित होत आहेत. खास करुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी या पुस्तकाचा क्रमिक पुस्तक म्हणून वापर करतात. या पुस्तकामध्ये भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना नायकाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. त्यावर आधारित एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.त्या पुस्तकामध्ये जे मांडण्यात आले आहे त्यानुसार, लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताची फाळणी नको होती. मात्र त्यावळेची परिस्थितीच अशी होती की, त्यांना इतर सर्व नेत्यांपुढे हार मानावी लागली होती. याशिवाय लॅपियर यांनी १९६५ मध्ये प्रकाशित झालेल्या इज पॅरिस बर्निंग नावाच्या पुस्तकाचे लेखन केले होते. त्यावरुन काही प्रमाणात वादही झाला होता.

सिटी ऑफ जॉय मुळे लोकप्रियता आणखी वाढली...

लॅपियर यांनी त्यांच्या हयातीत सिटी ऑफ जॉय नावाची एक कादंबरी लिहिली होती. जी १९८५ मध्ये प्रकाशित झाली होती. कोलकातामध्ये रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकाच्या आयुष्यावर वेगवेगळ्या बाजुनं भाष्य करणारी ही कादंबरी प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यावर आधारित चित्रपटही १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यात पॅट्रिक स्वेजनं मुख्य भूमिका साकारली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने