महाराष्ट्रतील वाहनांवर हल्ला केंद्राच्या सांगण्यावरुन; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन संवाद साधला पण त्यांचा आडमुठेपणा दिसला. अशातच बेळगावात जाण्याचा शिंदे गटाच्या मंत्र्यात दौरा सतत लांबणीवर पडत आहे. यासर्वांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना केंद्रावर गंभीवर आरोप केले आहेत. तसेच, पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला राऊत यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. महाराष्ट्रतील वाहनांवर हल्ला केंद्राच्या सांगण्यावरुन झाला असा गंभीर आरोप राऊत यांनी यावेळी केला आहे.राऊत काय म्हणाले?

मराठी स्वाभिमान कायमचा संपवण्याचा प्रयत्न सरु आहे. राज्याच्या सीम कुरतडल्या जात असतानादेखील राज्य सरकार गप्प आहे. एवढं हातबल सरकार आजवर पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी भाईगिरी दाखवावी. विरोधी पक्षाची मोठी जबाबदारी आहे. कठोर भूमिका घ्या अन्यथा राजीनामा द्या अशा मागणीही राऊत यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी कधी लाठ्या खाल्यात हे दाखवावं. भाजपकडून महाराष्ट्राची कोंडी सुरू आहे. हे सरकार दिल्लीत टेंडर भरुन आलेलं आहे. शिंदे गटाला निशाणी म्हणून कुलूप दिलं पाहिजे. महाराष्ट्रतील वाहनांवर हल्ला केंद्राच्या सांगण्यावरुन सुरू आहे. महाराष्ट्र पेटला तर केंद्र सरकार जबाबदार. सीमावाद आहे पण याआधी असं कधीच घडलं नव्हतं. केंद्राच्या इच्छेविना हा वाद शक्यच नाही. केंद्र ताकदवान असेल तर त्यांनी बोम्मईंना थांबवून दाखवावं. हे नामर्द लाचार सरकार आहे.तसेच, ताबडतोब बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा. पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाऊ. आम्ही कर्नाटकात जाणार. सीमाप्रश्नाचा मुद्दा संसदेतही गाजणार. जे मंत्री घाबरत आहेत. त्यांना सरंक्षण देऊन बेळगावत घेऊन जातो. दिल्ली चर्चा घेऊन हा सीमावादाचा प्रश्न सुटणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने