बॉलीवूड 300 कोटीत खुश, एकट्या 'अवतार'ची 83 अब्ज 84 कोटींची कमाई!

मुंबई: अवतारनं आपण काय चीज आहोत हे साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे. जेम्स कॅमेरुन या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर रचण्यास सुरुवात केली आहे. अवतार २ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हाच हा चित्रपट सगळे रेकॉर्ड आपल्या नावावर करणार असल्याचे सिद्ध झाले होते.अवतार द वे ऑफ वॉटरनं जगभरातून केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. भारतातूनही जेम्स कॅमेरुन यांच्या अवतारवर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या आहेत. आता अवतारनं केलेल्या अचाट कमाईचा आकडा समोर आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं जगभरातून १ बिलियनची कमाई केली आहे.अवतारनं एवढी शानदार कामगिरी करत आपल्याच पहिल्या चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. अवतारच्या प्रिक्वेलने रेकॉर्ड नव्या अवतार द वे ऑफ वॉटरनं पार केलं आहे. दोन आठवड्यामध्येच अवतारनं ही कामगिरी करुन दाखवली आहे. अफलातून दिग्दर्शन, अचाट करणारं तंत्रज्ञान, प्रभावी ग्राफीक्स आणि गुंगवून टाकणारं संगीत या सारं अवतारविषयी सांगता येईल. अवतार ही सर्वात वेगानं एक अब्जची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.अवतारनं त्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ घेतला आहे. भारतीय रुपयांमध्ये केलेली कमाई सांगायची झाल्यास ८२ अब्ज ८४ कोटी ९५ लाख रुपयांची कमाई केली आहे. यावरुन अवतारच्या अचाट कामगिरीचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. तब्बल तेरा वर्षांच्या ब्रेकनंतर कॅमेरुन यांनी अवतारचा दुसरा भाग प्रेक्षकांसमोर आणला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने